Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 189
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
पा꣣वका꣢ नः꣣ स꣡र꣢स्वती꣣ वा꣡जे꣢भिर्वा꣣जि꣡नी꣢वती । य꣣ज्ञं꣡ व꣢ष्टु धि꣣या꣡व꣢सुः ॥१८९॥
स्वर सहित पद पाठपा꣣वका꣢ । नः꣣ । स꣡र꣢꣯स्वती । वा꣡जे꣢꣯भिः । वा꣣जि꣡नी꣢वती । य꣣ज्ञ꣢म् । व꣣ष्टु । धिया꣡व꣢सुः । धि꣣या꣢ । व꣣सुः ॥१८९॥
स्वर रहित मन्त्र
पावका नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । यज्ञं वष्टु धियावसुः ॥१८९॥
स्वर रहित पद पाठ
पावका । नः । सरस्वती । वाजेभिः । वाजिनीवती । यज्ञम् । वष्टु । धियावसुः । धिया । वसुः ॥१८९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 189
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात वाणी व विदुषी हे विषय वर्णिले आहेत -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (वेदवाणीपर) - या ऋचेची देवता इन्द्र असल्यामुळे इन्द्राला उद्देशून म्हटले आहे - हे इन्द्र परमेश्वर, तुमची (वाजिनीवती) क्रिायमयी अथवा कर्म करण्यासाठी प्रेरणा देणारी (सरस्वती( ज्ञानमयी वेदवाणी (वाजेभिः) आपल्या विशेष ज्ञानरूप शक्तीद्वारे (नः) आम्हाला (पावका) पवित्र करणारी व्हावी. (घियावसुः) ज्ञान आणि कर्म यांच्या उपदेश देत आम्हा उपासकांना स्थिर वा दृढ श्रद्ध करणारी ती वेदवाणी (यज्ञम्) आमच्या जीवनरूप यज्ञाला (वष्टु) चांगल्या प्रकारे संचालित करो, सुसंस्कृत करो।।
(द्वितीय अर्थ) (गुरुवाणीपर) - गुरुजन कामना करीत आहेत - हे इन्द्र परमात्मा, तुमच्या कृपेने आमची (वाजिनीवती) विद्यामयी (सरस्वती) वाणी (वाजेभिः) सदाचाररूप धनाने (पावका) शिष्यांना पवित्र करणारी व्हावी. तसेच आमची वाणी (घियावसुः) शिष्यांच्या बुद्धीला मननशक्ती, त्यांना निश्चयात्मक करणारी होऊन (यज्ञम्) या आमच्या शिक्षणरूप यज्ञाचे (वष्टु) उत्तम प्रकारे वहन करणारी व्हावी (अशी आम्ही कामना करतो)।।
तृतीय अर्थ - (विदुषीपर) - हे इन्द्र, हे विद्वान गृहपती (संताने म्हणत आहेत) (वाजिनीवती) क्रियाशील (सरस्वती) आणि विदुषी अशी आमची माता (वाजेभिः) सात्त्विक, स्वास्थप्रद अन्न आदी पदार्थाद्वारे, शारीरिक शक्ती आणि उपदेशाद्वारे सदाचाराचे शिक्षण देत आम्हा मुलामुलींचे (पावका) तन व मन पवित्र करणारी असो. तसेच (धियावसुः) आम्हास बोध व उपदेश द्वेत स्थिर व दृढ निश्चयी करणारी असून (यज्ञम्) या गृहाश्रमरूप यज्ञाला (वष्टु) वहन करण्याचे सामर्थ्य धारण करो. ।। ५।।
भावार्थ - परमेश्वराची वेदवाणी ज्याप्रमाणे श्रोत्यांचे हित करते आणि जसे गुरूंची वाणी शिष्यांचे कल्याण कते, तद्वत घरातील विदुषी मातांनी आपापल्या संतानांचे भले करावे. ।। ५।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।। ५।।