Loading...
यजुर्वेद अध्याय - 17

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 31
    ऋषिः - भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः देवता - विश्वकर्मा देवता छन्दः - भुरिगार्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    1

    न तं वि॑दाथ॒ यऽइ॒मा ज॒जाना॒न्यद्यु॒ष्माक॒मन्त॑रं बभूव। नी॒हा॒रेण॒ प्रावृ॑ता॒ जल्प्या॑ चासु॒तृप॑ऽउक्थ॒शास॑श्चरन्ति॥३१॥

    स्वर सहित पद पाठ

    न। तम्। वि॒दा॒थ॒। यः। इ॒मा। ज॒जान॑। अ॒न्यत्। यु॒ष्माक॑म्। अन्तर॑म्। ब॒भू॒व॒। नी॒हा॒रेण॑। प्रावृ॑ताः। जल्प्या॑। च॒। अ॒सु॒तृप॒ इत्य॑सु॒ऽतृपः॑। उ॒क्थ॒शासः॑। उ॒क्थ॒शस॒ इत्यु॑क्थ॒ऽशसः॑। च॒र॒न्ति॒ ॥३१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    न तँविदाथ यऽइमा जजानान्यद्युष्माकमन्तरम्बभूव । नीहारेण प्रावृता जल्प्या चासुतृपऽउक्थशासश्चरन्ति ॥


    स्वर रहित पद पाठ

    न। तम्। विदाथ। यः। इमा। जजान। अन्यत्। युष्माकम्। अन्तरम्। बभूव। नीहारेण। प्रावृताः। जल्प्या। च। असुतृप इत्यसुऽतृपः। उक्थशासः। उक्थशस इत्युक्थऽशसः। चरन्ति॥३१॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 31
    Acknowledgment

    व्याखान -

    हे जीवांनो जो परमात्मा या सर्व जगाला निर्माण करणारा विश्वकर्मा आहे, त्याला तुम्ही जाणत नाही म्हणून (नीहारेण) तुम्ही अविद्येने, मिथ्यावादाने नास्तिकतेची बडबड करीत आहात. यामुळे तुम्हीच दुःखी व्हाल. तुम्हाला सुख मिळणार नाही. (असुतृपः) तुम्ही केवळ स्वार्थी बनून प्राणपोषणातच प्रवृत्त होत आहात. (उक्थशासश्चरन्ति) केवळ विषयोपभोगासाठी अवैदिक कर्म करीत आहात. ज्याने हे सर्व जग निर्माण केले त्या सर्वशक्तिमान न्यायी परब्रह्माच्या विरुद्ध जगात बागत आहात. म्हणून तुम्ही त्याला जाणत नाही. [प्रश्न] ब्रह्म व जीवात्मे हे दोन्ही एक आहेत किंवा नाही? [उत्तर] “अन्यत् युष्माकमन्तरं बभूव” ब्रह्म व जीवाचे ऐक्य वेदाद्वारे किंवा युक्तिद्वारेही कधीच सिद्ध होऊ शकत नाही. कारण जीव व ब्रह्म यात सनातन भेद आहे. जीव अविद्या इत्यादी दोषांनी युक्त आहे व ब्रह्म हे अविद्या दोषांनी मुक्त आहे. यावरून खात्री होते की जीव व ब्रह्म हे एक नाहीत, नव्हतेव एक होणार नाहीत. त्यांचा व्याप्यव्यापक, आधाराधेय, सेव्यसेवक इत्यादी संबंध आहे. यावरून जीव ब ब्रह्म यांचे ऐक्य मानने सयुक्तिक नाही.॥४४॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top