Loading...
ऋग्वेद मण्डल - 8 के सूक्त 103 के मन्त्र
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 8/ सूक्त 103/ मन्त्र 14
    ऋषिः - सोभरिः काण्वः देवता - अग्निः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः

    आग्ने॑ याहि म॒रुत्स॑खा रु॒द्रेभि॒: सोम॑पीतये । सोभ॑र्या॒ उप॑ सुष्टु॒तिं मा॒दय॑स्व॒ स्व॑र्णरे ॥

    स्वर सहित पद पाठ

    आ । अ॒ग्ने॒ । या॒हि॒ । म॒रुत्ऽस॑खा । रु॒द्रेभिः॑ । सोम॑ऽपीतये । सोभ॑र्याः॒ । उप॑ । सु॒ऽस्तु॒तिम् । मा॒दय॑स्व । स्वः॑ऽनरे ॥


    स्वर रहित मन्त्र

    आग्ने याहि मरुत्सखा रुद्रेभि: सोमपीतये । सोभर्या उप सुष्टुतिं मादयस्व स्वर्णरे ॥

    स्वर रहित पद पाठ

    आ । अग्ने । याहि । मरुत्ऽसखा । रुद्रेभिः । सोमऽपीतये । सोभर्याः । उप । सुऽस्तुतिम् । मादयस्व । स्वःऽनरे ॥ ८.१०३.१४

    ऋग्वेद - मण्डल » 8; सूक्त » 103; मन्त्र » 14
    अष्टक » 6; अध्याय » 7; वर्ग » 15; मन्त्र » 4
    Acknowledgment

    इंग्लिश (1)

    Meaning

    Agni, refulgent lord, friend of the mind and senses, come, arise in the heart with pranic energies for the protection and exaltation of the soul’s joy. Come, accept the adorations and prayers of the self-confident celebrant, join his golden yajna and exalt the ecstasy of his communion.

    इस भाष्य को एडिट करें

    मराठी (1)

    भावार्थ

    जो साधक सृष्टीतील पदार्थांचा बोध प्राप्त करण्यासाठी आपली ज्ञानेन्द्रिये व कर्मेन्द्रिये यांना परमेश्वराच्या आज्ञेनुसार संचालित करतो. प्राणशक्तीवर तो नियंत्रण करतो व पुन्हा परमेश्वराला आपल्या शुद्ध व बलवान अंत:करणात प्रदीप्त करतो. त्या दिव्य सुखी अंत:करणाने प्रतिध्वनित परमेश्वराचे गुण गात जणू परमेश्वराला आनंदित करतो. ॥१४॥

    टिप्पणी

    सृष्टीच्या आरंभी वेदाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावेळी कोणते राजे नव्हते व कोणताही इतिहास नव्हता. कोणी विशेष पुरुषही नव्हते. त्यामुळे त्यांच्या जीवन चरित्राचे वर्णनही नव्हते. परमेश्वराच्या ज्ञानात गुण गुणीचे वर्णन व त्या गुणी पदार्थांचा कर्मयोगात उपयोग तसेच ईश्वरोपासना आणि ज्ञान-विज्ञानाचे वर्णन चारही वेदात आहे अर्थात ऋग्वेदात गुण गुणींचे, यजुर्वेदात वरील पदार्थांचा यज्ञ इत्यादी कर्मात उपयोग करून लाभ घेण्याचे, साममध्ये ईश्वरोपासना व ईश्वरीय ज्ञानाच्या प्रकारचे, अर्थववेदात ज्ञान-विज्ञानाचे विशेषरूपाने वर्णन केलेले आहे. या प्रकारे चारही वेदांचे विषय भिन्न भिन्न आहेत. ही बाब ‘‘तस्माद्यज्ञात्सर्वहुते ऋच: सामानि जज्ञिरे’’ । मं. १० सूक्त ९०।९ मध्ये स्पष्ट होते. $ या मंत्रात चारही वेदांचे वर्णन स्पष्ट रीतीने आलेले आहे. केवळ हाच मंत्र नव्हे तर वेदांमध्ये वीसाहून अधिक मंत्र दिसून येतात की, ज्यात चारही वेदांचे वर्णन स्पष्टरूपाने दिसते. जे लोक हे मानतात की, ऋग्वेद सर्वात प्रथम असून इतर सर्व वेद ऋग्वेदाच्या आधारावर बनलेले आहेत, त्यांचे कथन निर्मूल आहे. कारण हे की ज्या प्रकारे ऋग्वेदाची स्वतंत्र सत्ता आहे, त्याच प्रकारे इतर वेदांचीही सत्ता स्वतंत्र आहे. हे ऋषीमुनींनाही मान्य आहे. ऋषीमुनीच नव्हे तर आधुनिक सायण इत्यादी भाष्यकारांनीही हे सर्व तंत्रसिद्धांत करून लिहिलेले आहे की, चारही वेद एकाच वेळी प्रकट झालेले आहेत. त्याचे प्रमाण या दृष्टीने ‘‘तस्माद्यज्ञात्’’ हाच मंत्र आपल्या ऋग्वेदाच्या भाष्य भूमिकेत दिलेला आहे. $ सायणाचार्यांनी हा विचार बहुतेक शतपथ ब्राह्मणातून घेतलेला आहे. शतपथ ब्राह्मणात स्पष्ट लिहिलेले आहे की, परमेश्वराने श्वासाप्रमाणे अनायासे चारही वेद प्रकट केलेले आहेत. याच गोष्टीचे प्रतिपादन व्याससूत्रात व शंकरभाष्यातही केलेले आहे. ‘‘शास्त्रयोनित्वात्’’ वेदान्ताच्या या तिसऱ्या सूत्रात श्री स्वामी शंकराचार्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे की, ऋग्, यजु:, सोम व अथर्व या चार वेदांचा कर्ता एक मात्र ब्रह्म आहे जीव विशेष नाही. $ वस्तुत : वेदात अशा नियमांचे वर्णन आहे की, जे सर्व देश व सर्व काळात उपयुक्त आहेत. ते नियम एखाद्या स्थान विशेषाचा आश्रय घेत नाहीत किंवा कालविशेषाचा आश्रय घेत नाहीत. $ तात्पर्य हे की वेदांचे अर्थ यौगिक आहेत. अर्वाचीन ग्रंथाप्रमाणे योगरूढ किंवा रूढ नाहीत अर्थात व्युत्पत्तीने जे अर्थ होतात तेच वेदाचे मुख्य अर्थ होत. व्युत्पत्ती सोडून ऐतिहासिक ग्रंथाप्रमाणे वेद रूढार्थात प्रवृत्त नसतात, ज्या लोकांनी यौगिक अर्थ सोडून वेदाच्या नावाचा पूर्वसिद्ध अर्थ प्रतिपादित केलेला आहे, त्यांनी अतिशय चूक केलेली आहे. $ उदाहरणार्थ - $ न सायकस्य चिकिते जनासो लोधं नयान्ते पशुमन्य माना : । $ नावाजिनं वाजिना हासयन्ति न गर्दभं पुरो अश्वान्नयन्ति ॥ $ - ऋ. ३.५३.२३ $ या मंत्रात सायणाचार्याने विश्वामित्र व वसिष्ठाचा इतिहास शोधला आहे. एकदा विश्वामित्राला वशिष्ठाच्या चेल्यानी बंदिस्त केले तेव्हा विश्वामित्राने त्यांना म्हटले की, मी मंत्रवेत्ता असल्यामुळे तुम्ही माझा प्रभाव जाणत नाही. माझ्याबरोबर तुमच्या गुरू वशिष्ठाची तुलना गाढव व घोड्याप्रमाणे आहे. या प्रकारे राग-द्वेष भाव या मंत्रात दर्शविलेला आहे. वास्तविक या मंत्राचा अर्थ असा आहे की (जनास:) हे माणसांनो! तुम्ही (सायकस्य) शस्त्रवेत्त्या शूर वीरांचे महत्त्व जाणत नाही. जो युद्धात दुसऱ्या पक्षाचा नाश करतो त्याचे नाव येथे सायक आहे. या प्रकारे हा मंत्र राजधर्माचा बोधक आहे. एखाद्या पुरुषाचा बोधक नाही. याच प्रकारे ज्या ज्या मंत्रांपासून सायणाचार्यानी इतिहास शोधलेला आहे ते सर्व मंत्र यौगिकार्थाने पुरुषांच्या गुणांचे वर्णन करतात किंवा अनादिसिद्ध ईश्वराचे प्रतिपादक आहेत. एखाद्या आधुनिक पुरुषाचे नव्हे. या गोष्टीचे पुष्ट प्रमाण पुरुष सूक्त आहे. ज्या प्रकारे पुरुषसूक्तात अनादिसिद्ध परमात्म पुरुषाचे वर्णन आहे, त्याच प्रकारे अनादिकाळापासून सिद्ध पुरुष, प्रकृती व जीवाचे वर्णन वेदात आढळून येते व जे देव, दस्यू, विद्वान, अविद्वान इत्यादी पुरुषांचे वर्णन वेदात आहे तेही प्रवाहरूपाने अनादिसिद्ध पुरुषांचे आहे. त्या सर्गाच्या व्यक्तिविशेषापन्न पुरुषांचे नव्हे. $ तात्पर्य हे की ‘‘सूर्याचन्द्रमसौधाता यथा पूर्वमकल्पयत’’ । $ ऋ. मं. १० सूक्त १९१ मं. ३ $ या मंत्रात ज्या प्रकारे अनादिकाळापासून सूर्यचन्द्र इत्यादी पदार्थांचा आविर्भाव तिरोभाव आढळून येतो. त्याचप्रकारे अनादिकाळापासून सर्व प्रकारच्या पुरुषांचा जो आविर्भाव, तिरोभावे आहे, त्यांचेच वर्णन वेदात आढळते इतर व्यक्तिविशेषांचे नाही, त्यावेळी कुणी व्यक्तिविशेष नव्हती तर तिचे वर्णन कसे होऊ शकते? पूर्वोक्त मंत्रात जे विश्वामित्र, वसिष्ठाचे वर्णन आढळून येते ते युक्तीने ही अत्यंत अर्थहीन, सारहीन आहे. कारण वेद हे विश्वामित्र, वसिष्ठ व रामचंद्राच्या वेळी प्रादुर्भूत झालेले नाहीत. त्यापूर्वीही लाखो वर्षांपूर्वी वेद निर्माण झालेले आहेत. $ ज्यांच्या मते लाखो वर्षांपूर्वी नाही, त्यांनाही हजारो वर्षाचा परित्याग कधीही करता येऊ शकत नाही. तो अशा प्रकारे की, वैदिक काळ हजारो वर्षांपर्यंत जगात होता तेव्हा ते लोक वेदोक्त ईश्वर व वैदिक पूजा-पाठ वैदिक आचार-अनाचार मानत होते, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथाच्या निर्मितीची वेळ आली तो काळही रामाच्या फार पूर्वीचा होता. त्याचा प्रभावही जगात हजारो वर्षे होता. एवढेच नव्हे तर ब्राह्मणकाळातही रामाच्या अस्तित्वाचे प्रमाण नाही. त्यामुळे ऐतरेय, शतपथ, ताण्ड्य व गोपथ या चारही वेदांच्या ब्राह्मणात रामचंद्राची कथा नाही. $ याज्ञवल्क्य व जनकाचा संवाद शतपथच्या शेवटच्या कांडात आढळतो तेव्हा कसे म्हणता येईल की, रामचंद्र ब्राह्मणाच्या वेळी नव्हते कारण रामचंद्र व जनकाचा संबंध वाल्मीकीय रामायणात स्पष्ट आहे. याचे उत्तर असे की, ज्या जनकाचे वर्णन, ‘बृहदारण्यकोपनिषद’ किंवा ‘शतपथ’च्या शेवटच्या कांडात आहे तो जनक रामाचा नातेवाईक नव्हता तर वेगळाच होता अशी एक भ्रांती पसरवणारी जनक कथा आहे जशी ‘छान्दोग्य’मध्ये ‘कृष्णाय देवकीपुत्राय’ ही कथा आहे. छान्दोग्यमध्ये जो देवकीपुत्र कृष्ण होता तो अन्य होता. तो कृष्ण चोर ऋषीचा शिष्य होता. ही गोष्ट आम्ही अन्यत्रही विशेषरूपाने लिहिलेली आहे त्यामुळे इथे लिहिण्याची आवश्यकता नाही. $ तात्पर्य हे की समान नाव असल्यामुळे किंवा पूर्वकालीन नाव नवीन कालात ठेवल्यामुळे असा भ्रम होतो. वास्तविक ब्राह्मण ग्रंथ प्रतिपादित जनक, वाल्मीकीय रामायणातील जनक नव्हता. जर तोच जनक होता, तर वाल्मीकी कथा ही ब्राह्मणग्रंथात असायला हवी होती. $ आमच्या मते वरील प्रकारचे वाक्य, ब्राह्मणग्रंथ व उपनिषदामध्ये येण्याचे कारण हेही असून शकते की, नवीन गोष्टींना प्राचीन सिद्ध करणाऱ्याचा भाव सदैव हाच होता की, प्राचीन ग्रंथातही नवीन काळ निर्मित वाक्ये मिसळतात. त्यासाठी हे पृष्ठ प्रमाण आहे की, वाल्मीकीय रामायण, मनुस्मृती, महाभारत इत्यादी ग्रंथात शेकडो गोष्टी नव्या काळात मिसळलेल्या आहेत, ज्या प्राचीन हस्तलिखितात नाहीत. $ वास्तविकता ही आहे की, वेदात इतिहास नव्हता; परंतु नवीन काळात सायण इत्यादी भाष्यकारांनी इतिहासप्रधान भाष्य करून वेदात इतिहास सिद्ध करण्यावर भर दिलेला आहे. जर कुणी असे म्हटले की, वेदातही नवीन वाक्य मिसळले जाऊ शकले असते तर नवीन काळाला प्राचीन सिद्ध करणाऱ्यांनी त्यात मिसळ का केली नाही? याचे उत्तर असे की, वेदाकडे अत्यंत पूज्यबुद्धीने पाहिले जात असे, लोक त्यांना कंठस्थ करत होते. त्यांची संख्या निर्धारित करत होते. त्यांना पदापर्यंत निर्धारित करत होते. तेव्हा त्यात प्रक्षेप होण्यास वावच नव्हता. $ मुख्यत्वे वेदांची भाषा अशी ब्रह्मवर्चस्विनी व ओजस्विनी आहे ज्यात नवीन वाक्य मिसळून त्याच रंगात रंगविणे कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. त्या सिद्धीसाठी हे पुष्ट प्रमाण आहे की, चारही वेदात पुरुषसूक्त आहे व त्याची भाषा चारही वेदात सारखीच आहे, भेद अंशमात्र नाही. $ जे लोक हे म्हणतात की प्राचीन आर्यांमध्ये वर्णव्यवस्था नव्हती तर वर्णव्यवस्थेचे हे पुरुषसूक्त कुणी तरी नंतर प्रक्षिप्त केलेले आहे. त्यांना हे कळले पाहिजे की, जर प्रक्षिप्त असते तर एका वेदात प्रक्षिप्त केलेले असते. चारही वेदात कसे? कारण प्राचीन आर्य तर चारही वेदांना कंठस्थ करत आलेले आहेत. तेव्हा कुणालाही हे सुचले नाही की, हा पाठ नंतर मिसळलेला आहे. वेद ईश्वरीय आहेत व ईश्वरीय वस्तूत कोणीही मनुष्य प्रक्षिप्त करू शकत नाही. $ मुख्य गोष्ट ही आहे की, वैदिक काळात अर्थात वेदाचा आविर्भाव व या काळात आर्यांचा धर्म कोणता होता? ते कुणाची पूजा करत होते? या प्रश्नाचा विचार करणे येथे अत्यावश्यक आहे. या विषयाच्या विवेचनेत आम्ही ऋग्वेदाच्या भूमिकेत हे लिहिलेले आहे की वैदिक काळातील आर्य केवळ एकाच पूजनीय परमेश्वराची पूजा करत होते. ज्याचे वर्णन ‘‘स्वधया तदेकम्’’ मं. १० सू. १२९ मं. २ इत्यादी वाक्यात स्पष्ट आहे. ‘‘हिरण्यगर्भ: समवर्त्तेताग्रे भूतस्य जात: पतिरेक आसीत । स दाधार पृथिवी द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥’’ या मंत्रात चराचर ब्रह्मांडाचा पती एकमात्र परमात्माच मानलेला आहे. मग कसे म्हणता येईल की वैदिक काळात नाना प्रकारचे देव होते व विविध देवांची आर्यलोक उपासना करत होते. परमेश्वराच्या एकत्वाचे समर्थन करणारा एक मात्र हाच मंत्र नाही तर परमेश्वराच्या एकत्व बोधकाचे वेदात हजारो मंत्र सापडतात, जसे $ य: प्राणतो निमिषतो महित्वैक इद्राजा जगतो बभूव । $ य ईशे अस्य द्विपदश्चतुष्पद: कस्मै देवाय हविषा विधेम । $ -8/7/3/3 $ य एक इद्विदयते वसु मर्ताय दाशुषे । $ यो देवानां नामधा एक एव तं सम्प्रश्नं भुवना यन्त्यन्या । $ ऋ. ८/३/१७/२ $ तमिदं निगतं सह: स एष एक एक वृदेक एव । $ अथर्व. १३-४/४/१९ $ एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानसाहु : । $ ऋ. २/३/२२/४६ $ तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य: पन्था विद्येतेऽपनाय । $ यजु. ३१-१८ $ न ते विष्णो जायमानो न जात: । $ ऋ. मं. ७, सू. ९९-२ $ इत्यादी हजारो मंत्र वेदात परमेश्वराच्या एकत्वाचे बोधन करतात, त्या सर्वांचा उल्लेख विस्तारभयाने येथे उद्धृत करता येत नाही. $ वरील मंत्रांवरून हे दिसून येते की, वैदिक काळात सूर्यचन्द्र यांचा निर्माणकर्ता एकमेव निराकार परमेश्वरच मानला जात होता. विविध देव नव्हे. $ जे लोक हे म्हणतात की, वैदिक काळात विविध देवांची उपासना होती. ते देव शब्दाचा खरा अर्थ न जाणल्यामुळे भ्रमात आहेत. तात्पर्य हे की देव शब्द हा दिव्य गुण असलेल्या पदार्थालाही म्हटले जाते व सूर्यचन्द्र इत्यादी प्रकाशमान पदार्थाचा वाचक ही आहे. तसेच विद्वान व विदुषी स्त्रीलाही म्हटले जाते. यामुळे अव्युत्पन्न (भाषा व्याकरणात ज्ञानशून्य व्यक्ती) लोकांना वेदात विविध देवांचा भ्रम झालेला आहे. $ वास्तविक वेदात ईश्वर स्वरूपाने सम्मत विविध देव नाहीत, परंतु या जगाचा निर्माता व विधाता एकमेव परमेश्वर मानला गेलेला आहे. याच अभिप्रायाने असे म्हटले आहे की ‘‘एषो हि देव: प्रदिशोऽनुसर्वा:’’ यजु. ३२-४ संपूर्ण दिशांमध्ये परिपूर्ण एक देव परमेश्वरच आहे. इतर कोणी नाही हाच भाव उपनिषदकार ऋषींनी या प्रकारे दर्शविलेला आहे. $ एको देव: सर्वभूतेषु गूढ: सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा । $ श्वे. ६-११ $ एकमेव परमात्माच सर्व भूतात व्यापक व सर्व भूतांचा अंतरात्मा आहे याच भावाने ‘‘सूर्याचन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत्’’ । $ इत्यादी मंत्रात सूर्यचद्रांची निर्मिती करणाऱ्या परमात्म्याचे वर्णन केलेले आहे. याप्रकारे वैदिक काळात लोक एकाच परमेश्वराला उपास्यदेव जगत्कर्ता मानत होते. $ जे लोक म्हणतात की, परमेश्वराला जर कर्ता मानले तर तो आनंदस्वरूप राहू शकत नाही. त्यांना हे विचारावे लागेल की तुम्ही जेव्हा एखादे शुभ काम करता तेव्हा तुम्ही आनंदाचा अनुभव घेता की दु:खाचा. $ असे म्हटले जाते की, सर्वव्यापकामध्ये क्रिया नसते. कारण कोणतीही जागा त्याच्यापासून रिक्त नसते. ज्यात तो गती करेल. पूर्वोक्त कुतर्क करणाऱ्या लोकांना क्रिया, कर्म किंवा गतीचे तात्पर्य समजले नाही, क्रियेचे अर्थ स्वाभाविक बलरूप शक्तीचेही आहेत अथवा ज्ञानाचेही आहेत व अशी शक्ती सर्वव्यापक परमेश्वरातच असते. याचा बाधक असा कोणताही तर्क नाही. $ दुसरी युक्ती अशी आहे की, जेव्हा (आकाश) ईथर इत्यादी सापेक्ष विभु पदार्थ गतिशील आहेत अर्थात कित्येक गुणांच्या अभिव्यक्तीचे कारण आहेत मग कसे म्हटले जाऊ शकते की निराकार विभूमध्ये गती नसते. $ वास्तविक गोष्ट अशी आहे की, अल्पशक्तीवाल्या जड पदार्थात विषय दृष्टान्तांनी लोकांना हा भ्रम होतो की, सर्वत्र भरलेल्या पदार्थात क्रिया होत नाही. त्यांना हे विचारले पाहिजे की तुम्ही एका शुद्ध काचेच्या पात्रात जल किंवा दूध भरा एक अंशही रिकामा राहता कामा नये. त्यानंतर त्याला जोरात हलवा तेव्हा त्यात गती दिसते किंवा नाही. जर हे म्हटले की तो एकदेशी आहे त्यामुळे गती होते तर हे उत्तर आहे की परिपूर्ण असल्यामुळे तो एकदेशी नाही. $ वास्तविक जर पाहिले तर जड पदार्थात बाहेरून गतीचे आधान केले जाते. जो स्वत: गतिशील आहे त्याच्या गतीला कोण बाधा आणू शकतो? $ सर्व व्यापकात गती नसते? $ आनंदस्वरूप जर कर्ता मानला तर तो निरानंद होतो काय? प्रलय इत्यादी भावांचा कर्ता ईश्वर न्यायकारी व अहंता (अभिमानी) सिद्ध होत नाही इत्यादी कुतर्क ‘‘बौद्धिझम’’ व ‘‘जैनीझम’’च्या संपर्काने उत्पन्न झालेले आहेत. $ वास्तविक वैदिक तत्त्वज्ञानात त्यांचा गंधही नाही त्यामुळे वेदात म्हटले आहे- $ तदेजति तनैजति तददूरे तदान्तिके । $ तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य याह्यत: । $ यजु. ४०।५ $ तो चालतो ही, चालत ही नाही. दूर ही आहे, जवळ ही आहे. अर्थात जग उत्पन्न करण्यात गतिशील आहे व एका स्थानांपासून दुसऱ्या स्थानापर्यंत जाण्यासाठी एकरस व कुटस्थ (सर्वश्रेष्ठ) आहे. सर्वव्यापक असल्यामुळे दूर व जवळ इत्यादी धर्मांनी रहित आहे. $ हे सर्व भाव परमेश्वरामध्ये अविरुद्ध आहेत. ज्याप्रकारे परमात्मवाद स्फूट रीतीने वेदात दिसून येतो तसा अन्य कोणत्याही धर्माभिमान्याच्या पुस्तकात नाही व जसे परमेश्वराचे एकत्व वेदात आहे तसे इतर कोणत्याही ग्रंथात नाही. $ प्रमाणासाठी पाहा $ अनेजदेकम् यजु. ४०।४ $ तत्र को मोह: क: शोक एकत्वमनु-पश्यत: यजु. ४०।७ $ इत्यादी मंत्रात परमेश्वराचे एकत्व व निराकारत्व स्पष्टपणे वर्णिलेले आहे. $ ज्या प्रकारे सर्वोत्कृष्ट उपासनीय देवाचे महत्त्व वेदात आढळून येते त्याच प्रकारे इतरही उत्तमोत्तम भाव वेदात आढळतात अर्थात वैदिक काळात दास भाव नव्हता. त्यामुळे वेदामध्ये दासत्व धर्म नव्हता, जाती नव्हती अर्थात जो एकमेव सेवाधर्म करत असे तो दास होता व जर तोच स्वामीचा धर्म पालन करीत असेल तर तो स्वामी बनत असे व दासत्व जाती मानून कुणाचा क्रय-विक्रय होत नसे. माणसांना समानाधिकार होता. त्यासाठी माणसांच्या गुणांमुळे माणसांमध्ये न्यूनाधिक भाव होता. याचेच नाव गुण कर्मानुसार वर्णव्यवस्था होय. $ वैदिक रीतीनुसार वैदिक काळात दम्पत्तीभाव ही वैदिक होता. अर्थात एका स्त्रीचा एक पती व पतीची एकच पत्नी होती. वैदिक काळात एकही पुरुष असा नव्हता की ज्याने अनेक विवाह केलेले होते. वैदिक काळाचे लक्ष गृहस्थ धर्माचे देव–ऋण, पितृ-ऋण व ऋषि ऋण या तीनही ऋणांतून मुक्त होणे होय. आधुनिक काळाप्रमाणे विषयभोग किंवा दास-दासी बनवून ऐश्वर्यशाली होणे, वैदिक काळात लक्ष नव्हते. जसे - $ ‘‘परस्पर प्रेमभावाचे मंत्र वेदात पुष्कळ आहेत. दृते दृँह या मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम् ।’’ $ यजु. अ. ३६ मं. १८ $ इत्यादी मंत्रात मैत्री भावाचा उपदेश स्पष्टरीतीने केलेला आहे. $ जेथे दस्यु दमन किंवा दुष्ट दमनाचे उपदेश आढळून येतात ते जगाची मर्यादा स्थिर करण्यासाठी आहेत. द्वेषाग्नी प्रदीप्त करण्यासाठी नाही, इतकेच नव्हे तर अहिंसेला सार्वभौमव्रत समजले जाई. $ दार्शनिक गोष्टी- जीवात्म्याचे नित्यत्व, पुनर्जन्म, बंध व मोक्ष इत्यादी भाव वेदात स्पष्टरीतीने आढळून येतात. जसे ‘‘योयमजोभागस्तपसा तं तपस्व’’ अन्त्येष्टि संस्कारात हे कथन केलेले आहे की या शरीरात जी जीवरूप अविनाशी वस्तू आहे तिला तपस्वी बनवून तुम्ही परलोकाचा यात्री बनवा. ही प्रार्थना ईश्वराला केलेली आहे. ‘‘एव मृत्योर्मुक्षीय मामृतात’’ इत्यादी वाक्यात अमृतरूपी मुक्तीचे स्पष्ट रूपाने वर्णन आहे. याच प्रकारे वैदिक काळाची मर्यादा होती. त्याचे वर्णन वेदभाष्यात विस्तारपूर्वक केलेले आहे. ही मर्यादा लाखो वर्षे आर्यांमध्ये होती. याचेच नाव वैदिक काळ होय. $ ब्राह्मण काळ $ काही काळानंतर ऋषींनी वेदांचे व्याख्यान ब्राह्मण ग्रंथ निर्माण केले. $ ऐतरेय, शतपथ, ताण्ड्य, महाब्राह्मण इत्यादी आठ ब्राह्मण व गोपथ हे वेदांचे चार ब्राह्मण आहेत. त्यात आलंकारिक रीतीने वैदिक विषयांवर विस्तारपूर्वक व्याख्या केलेली आहे. देवासुर-संग्राम, प्राणविद्या, ब्रह्मविद्या, नीतिविद्या, धनुर्विद्या इत्यादी पुष्कळ विद्यांचे वर्णन ब्राह्मणग्रंथात आहे. यावेळी ऋषींनी वेदविद्या दोन भागात विभागली अर्थात् एक आरण्यक व दुसरी उपनिषद, अभ्युदय करणाऱ्या विद्येचे नाव आरण्यक व कार्यकांडाच्या विद्येचे नाव उपनिषद होय. त्यामुळे उपनिषदाचे हे अर्थ केले जात होते की, ‘‘उपनिषीदतिं ब्रह्मसामिप्यं यथा सोपनिषद्’’ ज्यामुळे ब्रह्माची निश्चित प्राप्ती होते. त्याचे नाव उपनिषद पडले. ब्राह्मण ग्रंथाच्या वेळी वेदाच्या आलंकारिक भावांना लोक भुलले होते किंवा असे म्हणता येईल की, केवळ यज्ञच मुख्य समजला जाई. त्यामुळे त्याबद्दल अरुची उत्पन्न होऊन ज्ञानकांडाचे प्राबल्य होऊ लागले. $ उपनिषत् काल $ ज्यावेळी उपनिषदे निर्माण झाली, त्याकाळी ब्रह्मवादाचा इतका प्रभाव होता की, ‘‘सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानितिशान्त उपासीत’’ $ छां. ३।१४।१-५ $ इत्यादी वाक्यांद्वारे एकमेव ब्रह्माचीच उपासना सुरू झाली. छान्दोग्य व बृहदारण्यक इत्यादी मोठमोठ्या उपनिषदांची निर्मिती याचवेळी झाली. जरी त्यांचा काळ निर्धारित करणे कठीण आहे तरीही निश्चयपूर्वक हे म्हणता येईल की, हा काळ ‘‘बुद्धा’’ पूर्वी हजारो वर्षे होता. ज्या प्रकारे वाल्मीकीय रामायणामध्ये गंगासंगम प्रयागचे व महाभारतात गंगाद्वार ब्रह्मकुंड हरिद्वारचे नाव प्रसिद्ध होते. $ याच प्रकारे उपनिषद काळात वाराणसीचे नाव काशी होते त्यावेळी विद्यारूपी प्रकाशाचे मुख्य स्थान हेच होते. मोठमोठ्या गूढ तत्त्वांचा व रहस्यांचा निर्णय याच स्थानाहून केला जात होता. या स्थानाची निर्मिती वाल्मीकीरामायणापासून अर्वाचीन काळात व महाभारतापेक्षा प्राचीन काळात झालेली आहे. $ जरी या निर्माणकाळाचा योग्य शोध घेणे अवघड आहे तरी निश्चयपूर्वक म्हटले जाते की, तक्षशिला व सारनाथ इत्यादी स्थान जे एकेकाळी बौद्धांचे मुख्य क्षेत्र बनले होते. त्यांची निर्मिती काशीनंतर पुष्कळ वर्षांनी झालेली आहे. या विषयी योग्य प्रमाण हे की अजातशत्रू नावाच्या राजाने बालाकि नावाच्या ब्राह्मणाला विचारल्यावर ब्राह्मणाने त्याचे उत्तर दिले की, ‘‘ब्रह्म ते ब्रवाणि’’ मी तुला ब्रह्माचा उपदेश करीन. $ तेव्हा ब्राह्मणाने सूर्याला ब्रह्म म्हटले. राजाने सूर्याला ब्रह्म म्हटल्याचे खंडन केले. मग त्याने चंद्राला ब्रह्म म्हटले. राजाने त्याचेही खंडन केले. या प्रकारे ज्या ज्या भौतिक पदार्थांना त्याने ब्रह्म म्हटले, राजाने त्याचे खंडन केले. शेवटी ब्राह्मणाने मान खाली घातली तेव्हा राजाने त्याला निराकार ब्रह्माचा उपदेश केला. ही कथा बृहदारण्यकाच्या अ. २ मध्ये प्रसिद्ध आहे. यावरून हे सार निघते की बृहदारण्यक उपनिषदाच्या निर्माणकाळात काशी हे ब्रह्मविद्येचे मुख्य स्थान होते. त्यावेळी काशीत एकमेव ब्रह्माची उपासना होत होती. एखादा चुकून प्रतीकामध्ये ब्रह्मबुद्धी करत असे, त्याला बालाकि ब्राह्मणाप्रमाणे नतमस्तक व्हावे लागत असे. $ तात्पर्य हे की ब्राह्मण ग्रंथांच्या आलंकारिक कथांनी सूर्य-चंद्र इत्यादींमध्ये ब्रह्मबुद्धी भ्रमाने उत्पन्न होत होती. त्याला औपनिषद काळी संपूर्ण दाबून टाकले. $ येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. प्रतीकोपासना व मूर्तिपूजन यात फार भेद आहे. प्रतीकोपासनचा अर्थ एखाद्या ज्योतिष्मान पदार्थात ब्रह्मबुद्धी करणे आहे तर मूर्तिपूजा एखाद्या मूर्त पदार्थाला ब्रह्म समजून पूजा करणे होय. काही जरी असले तरी वैदिक धर्मानुयायी लोकांसाठी हे दोन्ही मार्ग हेच आहेत उपादेय नाहीत. $ याच अभिप्रायाने व्याससूत्रात याचा निषेध केलेला आहे. ‘‘न प्रतीके नहिस:’’ ४।१।४ प्रतीकामध्ये ब्रह्मबुद्धी करता कामा नये. कारण प्रतीक ब्रह्म नाही. $ कित्येक लोकांना वरील विषयाबाबत शंका येते की, ब्रह्मन् शब्दाचे वाच्य जे वैदिक काळात देव विशेष होते किंवा स्तोत्र अथवा अन्न इत्यादी पदार्थांना ब्रह्म म्हटले जात होते. त्याला उपनिषदाचे कर्ते, ऋषींनी जगज्जन्म इत्यादीकारणाने ब्रह्म बनविले होते : $ हे कथन सर्वथा युक्तिशून्य व मिथ्या आहे. वेदात ही मुख्यत्वे ब्रह्म शब्द ईश्वराच्या अर्थानेच आलेला आहे. जसे - ‘‘तदेव शुक्रं तद ब्रह्म’’ - यजु. ३२।१ ‘‘तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नम:’’ अथर्व. १०।८।४।१।२ $ डॉ. विल्सन इत्यादी युरोपियन किंवा सर रमेशचंद्र दत्त इत्यादी लेखकांचे लेख वाचून कित्येक पंडितांचे विचार बनले की ब्रह्म शब्द ऋग्वेदामध्ये ईश्वराच्या अर्थाने नाही, तर त्याचे उत्तर असे की, ‘‘ब्रह्म गामश्वं जनयन्त ओषधीर्वनस्पतीन्पृथिवीं पर्वताँ: अप:’’ मं. १०।सू.६५ मं. ११ ब्रह्माने पृथ्वी, पर्वत, वनस्पती, गाय व घोडे इत्यादी सर्व वस्तूंना उत्पन्न केले व ‘‘ब्रह्मणा वाव्रधाना’’ मं. १।सू. ९३। मं.६ मध्ये ब्रह्म शब्द ईश्वराच्या अर्थाने आलेला आहे. $ तत्त्व हे की उपनिषद बनविणाऱ्यांनी ब्रह्म नाव वेदातून घेतलेले आहे. त्यांनी स्वत: कल्पना करून ब्रह्मवाद चालविला नाही. $ औपनिषदाच्या काळात प्रतीकोपासनेचे बलपूर्वक खंडन केले गेले. जेथे ‘‘मनो ब्रह्मेत्युपासीत’’ छां. ३।१८।१ ‘‘आदित्यो ब्रह्मे त्यो देश:’’ छां. ३।१९।१ इत्यादी वाक्यात प्रतीकोपासनेचे कथन आहे. ते पूर्वपक्षाच्या रीतीने आहे. सिद्धांत पक्ष सर्वत्र उपनिषदामध्ये हेच आहे की ‘‘तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते’’ के. १।५ ‘‘विरजं ब्रह्म निष्फलं’’ मं. २।२।९ ‘‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’’ तै. २।१ ‘‘अद्वैतं ब्रह्म’’ छां. ३।१२।७ ‘‘विज्ञानमानन्दं ब्रह्म’’ बृह. ३।९।२८ ‘‘विज्ञानं सर्वे देवा ब्रह्म ज्येष्ठमुपासते’’ तै २।५ ‘‘स वायमात्मा ब्रह्म विज्ञानमय:’’ बृ. ४।४।५ ब्रह्मोपासनेची अनेक वाक्ये उपनिषदामध्ये आढळून येतात. वरील ब्रह्मज्ञानरूपी जाह्नवीतटावर त्यावेळी काशीनगरी निर्माण झाली सर्वात प्रथम ऋ. मं. ३ सूक्त. ३० मं. ५ मध्ये या प्रमाणे सांगितलेले आहे. ‘‘मघवन काशिरित्ते’’ हे ऐश्वर्ययुक्त (काशि:) तुझी न्याय नियमयक्त दीप्ती ग्रहण करण्यायोग्य आहे. जरी येथे ‘काशी’ हृस्वे इकारान्त आहे व उपनिषद व ब्राह्मणामध्ये दीघ ईकारान्त आहे तरी वेद, ब्राह्मण व उपनिषदामध्ये ‘काशी’ प्रकाशिकेचे नाव आहे. या ब्रह्मवर्चस्वी ज्योतीच्या अभिप्रायाने या नगराचे नाव काशी आहे. यावरून हे दिसून येते की, त्यावेळी वैदिक ज्ञानाचे सागर व उपनिषत् तत्त्वाचे वेत्ते ब्रह्मऋषी या नगरीत निवास करत होते. त्यावेळी दृप्त (अभिमानी) बालार्क ब्राह्मणाने काशीच्या अजातशत्रू राजाला म्हटले होते की मी तुम्हाला ब्रह्म दाखवीन. $ या गोष्टीचे विवेचन करणे अत्यंत कठीण आहे की, कोणत्या वेळी काशी नगराची निर्मिती झाली. तरी हे अनायासपूर्वक सांगता येईल की, वाल्मीकीय रामायणाच्या वेळी हे नगर वसलेले नव्हते. त्यामुळे त्यात त्याचे वर्णन नाही. महाभारताच्या वेळी याचे वर्णन स्पष्ट आहे. जसे ‘‘काशीराजश्च वीर्यवान.’’ $ मुख्य गोष्ट ही आहे की, उपनिषदाच्या काळी हे स्थान भारत वर्षात ज्ञानाचे प्रसिद्ध क्षेत्र होते. उपनिषदाच्या काळी हजारो वर्षानंतर जेव्हा न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा या सहा दर्शनांची निर्मिती झाली ती उपनिषद व महाभारताच्या मध्ये झालेली आहे. याचे कारण असे की,‘‘ब्रह्म सूत्रपदैश्चैव हेतुमभ्दिर्विनिश्चितै:’’ महाभारताच्या या वाक्याने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ‘ब्रह्मसूत्र’ ज्याचे नाव ‘व्याससूत्र’ किंवा ‘वेदान्तसूत्र’ ही आहे. ते महाभारतापूर्वी बनलेले आहेत. या सूत्रात न्याय, वैशेषिक, सांख्य, योग इत्यादी सूत्रांचे वर्णन चांगल्या प्रकारे आलेले आहे. यावरून स्पष्ट सिद्ध होते की ‘दर्शन’ महाभारतापूर्वीचे आहेत. $ या प्रसंगी असे ही अनुमान काढता येते की, बौद्ध धर्माचे वर्णन महाभारतात कुठे कुठे आढळून येते तरी महाभारत बुद्धानंतर होणे शक्य वाटत नाही व बौद्ध दर्शनाचे महाभारतात वर्णन येणे याचे दुसरे कारण आहे. महाभारत वेळोवेळी वृद्धिंगत होत गेले याचे निश्चित प्रमाण आताही हस्तलिखित पुस्तकातून मिळू शकते. पूर्वोत्तर निर्णय करण्याने ही गोष्ट चांगल्या प्रकारे स्पष्ट होते की, ज्यावेळी बुद्धदेव झाले त्यावेळी भारतवर्षात कर्मयोगी व ज्ञानयोगी यांचे प्राधान्य नव्हते व क्षात्रधर्माचे उद्दीपक उद्योगप्रधान नव्हेत तर यापेक्षा अत्यंत विपरीत आळस, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, हिंसाधर्मप्रधान वाममार्गाची प्रधानता होती. त्याचवेळी वेदाची हिंसा प्राधान्य व वाममार्गाची प्रधानता सूचक अनंत प्रकारच्या टीका-टिप्पणी होत होत्या. औपनिषद ज्ञानाची उच्च पताका जी काशीनगरीत हजारो वर्षे फडकत होती ती काळाच्या प्रभावाने किंवा भारतीय संग्रामाग्नीत भस्मीभूत झाली. त्यामुळे बुद्धदेव उत्पन्न झाले. त्यावेळी दर्शन व उपनिषदाचा विशेष प्रचार नव्हता व संस्कृत भाषेचा प्रचारही हीन दीन अवस्थेत होता. याच कारणाने बुद्धाच्या वेळी संस्कृत संदर्भाची निर्मिती झाली नाही. बुद्धदेवाने केवळ निवृत्ती मार्गप्रधान निर्वाणाचा उपदेश केला. ज्यात अभ्युदय किंवा उद्योगाचा गंध नव्हता. $ बुद्ध धर्माचा उपदेश वैदिक अभ्युदय मंत्राच्या आशयाने रहित होता व त्यात उपनिषदांचे व दर्शनाचे उत्तमोत्तम भाव नव्हते तरी त्या उपदेशाचा प्रचार फार वेगाने झाला कारण त्यावेळी हिंसा व अनाचाराचा भाव दूर करणाऱ्या सदुपदेशकाची अत्यंत आवश्यकता होती यामुळेच सर्वसाधारण लोकात त्यांचा उपदेश पसरला. $ येथे कित्येक लोक म्हणतात की, बुद्धाच्या काळी आर्यांची निर्मिती झालेली नव्हती. बुद्ध व बुद्ध धर्माचा निर्देश करून खंडन केलेले नाही कसे केले जाईल.१ महाभारताच्या वाक्याने सिद्ध केलेले आहे की, दर्शन महाभारतापूर्वी बनलेले आहेत. जर बुद्ध महाभारतापूर्वी असता तर गीताकाराने त्याचे वर्णन अवश्य केले असते कारण ‘‘यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेववा । तत्त देवावगच्छ त्वं मम तेजोऽश सम्भवम’’ ॥ $ जी जी विभूती असणारी वस्तू आहे ती सर्व माझ्या तेजाने उत्पन्न झालेली आहे. तर जेथे ‘‘सिद्धानां कपिलेा मुनि’’चे वर्णन आहे तेथे बुद्धाचे वर्णन येणार नाही. यावरून हे स्पष्ट सिद्ध होते की, जो कपिल सांख्यशास्त्राचा निर्माता आहे तो बुद्धाच्या फार पूर्वी होता. $ अनेक इतिहासकार लिहितात की बुद्ध ‘‘कपिलवस्तु’’ मध्ये झाला होता व हा कपिल सांख्यदर्शनकार कपिल नावाने प्रसिद्ध होता व कपिलच्या आश्रमात बुद्धाचे पूर्वजही एके काळी राहिले होते. ही कथा पूर्वोक्त युक्तीनीही सांख्यशास्त्रकर्ता कपिलला सिद्ध करत नाही. परंतु कुणा एका कपिलचे वर्णन करते. $ मुख्य प्रसंग हा आहे की बुद्धाने आपल्या काळात संयमी बनून शम, दम इत्यादींचा प्रचार केला व त्यावेळी कर्मकांडी व वेदाभिमान्यांना अत्यंत तुच्छ मानले.१ महात्मा बुद्धाचा अंतिम काळ ईसामसीह पूर्वी ४७८ वर्षे होता. त्यांच्यानंतर त्यांच्या धर्माचे इतके महत्त्व वाढले की, मगध देशच नाही तर संपूर्ण भारत देशात बौद्धांचे प्राबल्य वाढले ज्याला आर्यावर्त म्हटले जाते. त्या सीमा पार करून मालाकंद, अफगाणिस्थान, क्वेटा, बलुचिस्थान इत्यादी अनेक देश पादाक्रान्त केले गेले. त्यावेळी जड जलस्थलांची कथाच काय तर मीमांसाशास्त्राचे भाष्यकर्ता शब्द स्वामी व वार्तिकचे कर्ता कुमारिल भट्ट इत्यादी धुरधंर पंडितांवर ही - $ कुम्भकाराधधिष्ठानं घटादौ यदि चेष्यते । $ नेश्वराधिष्ठितत्वं स्यादस्ति चेत्साध्यहीनता ॥ $ घट इत्यादी कार्याच्या दृष्टान्ताने जी ईश्वराची सिद्धी केली जाते ती योग्य नाही कारण घटाचा कर्ता जो कुंभार आहे, तोच प्रथम ईश्वर नाही अर्थात जन्ममरणयुक्त मनुष्य आहे, या प्रकारे हा दृष्टांत साध्यहीन आहे. $ त्याकाळी जेवढे विद्वान झाले ते बौद्ध धर्माच्या संपर्करूपी गंधाने निर्गंध (गंधहीन) नव्हते. याचप्रकारे पूर्वमीमांसाचे भाष्यकार शबर स्वामीने कुठे ईश्वराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यावेळी त्याच मगध देशात बुद्धदेव जन्मले, वर्धमान महावीर नामक तीर्थंकर जैनांचे अंतिम तीर्थंकर होते. त्यावेळी न्यायशास्त्राचे वेत्ता नैयायिकांनी ‘‘आत्मतत्वविवेक’’ इत्यादी कित्येक ईश्वरसाधक ग्रंथांची निर्मिती केलेली होती. $ या खंडन मण्डनाच्या घोर संग्रामात कित्येक राजे महाराजे बौद्धधर्मानुयायी झाले. याचा इतका प्रभाव होता की वैदिक लोकांच्या काशीनगरीचे महत्त्व कमी करण्यासाठी काशीनगरीपासून सात मैल दूर सारनाथ वसविले. याचे प्रयोजन असे होते की काशीनगरीचे महत्त्व कमी करून आपले महत्त्व वाढावे. जान्हवी तटाचा त्याग करून सारनाथ बनविण्याचे तात्पर्य हेच होते की जे गंगातटाची शरण घेत होते त्या गंगातटाचे काही महत्त्व नाही कारण ते वैदिकांप्रमाणे सकाळ संध्याकाळ वंदन करत नव्हते. सारनाथाचे महत्त्व असे वाढले की बौद्धांच्या प्रभावाने प्राचीन काशीला महत्त्वहीन केले याची अनेक कारणे होती. $ १) त्यावेळी ब्राह्मण लोकांनी वेदाचा अभ्यास सोडला होता. $ २) जे त्यांच्यापैकी वेदाभ्यास करत होते. ते ब्राह्मणग्रंथातील अलंकारांना न समजून मिथ्या कथांमध्ये रमून, वाममार्ग-बोधक अर्थ काढून वेदाचे महत्त्व कमी करत होते. यामुळे बौद्धांचे महत्त्व अधिक वाढले. $ त्यावेळी जेथे शास्त्रार्थ होत असे त्यावेळी वैदिक धर्मीयांच्या मंतव्यानुसार वेदामध्ये अश्लीलता, वाममार्ग व पशुयज्ञ दाखवून बौद्ध लोक त्यांना जिंकत असत. त्यावेळी रचलेले हे काव्य ‘‘त्रयो वेदस्य कर्तारो धूर्तभांडनिशाचरा:’’ अर्थात वेदांना धूर्त भांड, राक्षसांनी बनविलेले आहे कारण त्यात लज्जाजनक गोष्टी, यज्ञात पशूंना मारणे व वाममार्गाच्या गोष्टी आढळून येतात. या शस्त्रांनी भारताच्या धर्मयुद्ध-क्षेत्रात बौद्धांनी विजय प्राप्त केला व आर्यांचा पराजय झाला. त्याचा इतका भयंकर परिणाम झाला की राजा अजातशत्रू व अशोक इत्यादी मोठमोठे राजे बौद्ध धर्मानुयायी बनले. $ कित्येक ग्रंथकारांचे हे मत आहे की, तक्षशिलेचे विश्वविद्यालयही त्याचवेळी निर्माण झाले. परंतु ही गोष्ट आमच्या मते निर्मूल आहे. त्याची खालील कारणे आहेत. $ १) पाणिनीय सूत्रात तक्षशिलेचे वर्णन आहे. भगवान पाणिनि बुद्धाच्या फार पूर्वी झालेले होते. $ २) भगवान पजञ्जली भाष्यकाराने बौद्ध धर्माचा कुठेही उल्लेख केलेला नाही. $ ३) वरील ग्रंथकारांनी पाली प्राकृत भाषेची चर्चा कुठेच केलेली नाही. जी बौद्धांची मुख्य भाषा होती. यावरून हे दिसून येते की तक्षशिला पूर्वी वैदिक धर्मानुयायी आर्यांची होती नंतर त्यावर बौद्धांचा अधिकार झाला. $ काहीही असो,हे कथांतर आहे की प्राचीन काशी व तक्षशिला तसेच सारनाथ इत्यादी स्थानी बौद्ध धर्माचा प्रभाव झाला. त्यात बौद्ध धर्माच्या प्रतिमापेक्षा वेगळ्या प्रतिमा आढळत नाहीत. यावरून स्पष्ट सिद्ध होते की वैदिक धर्मानुयायी आर्य प्रतिमापूजन प्रिय नव्हते. कित्येक लोक म्हणतात की ‘‘मूर्तौ घन:’’ ३।३।७७ ‘‘जीविकार्थेचापण्ये’’ ५।३।९९ या पाणिनीय सूत्रांनी व ‘‘प्रतिमानाञ्च भेदक:’’ इत्यादी मनुच्या वाक्याने सिद्ध होते की आर्यांमध्ये प्रथम प्रतिमापूजन नव्हते. $ याचे उत्तर असे की ‘‘मूर्तौ घन:’’ ३।३।७७ अष्टाध्यायीच्या सूत्राने हे सिद्ध केलेले आहे की हन्तिला अप व घन आदेश होऊन अभ्रवन इत्यादी प्रयोग सिद्ध होतात ज्यांच्याकडून मूर्त पदार्थाचे काठिण्य प्राप्त होते. प्राचीन आर्य पृथ्वी इत्यादी पदार्थांंमध्ये मूर्तत्व धर्म मानत नव्हते? यामुळे प्रतिमा पूजनाची सिद्धी कशी होते? $ ‘जीविकार्थे चापण्ये’ ५।३।९९ या सूत्राने प्रतिमापूजन सिद्ध केले जाते ते योग्य नाही कारण हे सूत्र हे सिद्ध करते की व्यास, वशिष्ठ ऋषी महर्षींच्या ज्या प्रतिकृती बनविल्या जातील त्या विक्रीच्या उद्देशाने बनविल्या तर त्यापासून कव् प्रत्ययाचा लुक् होता कामा नये. $ येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की यापूर्वीच्या सूत्रात ‘लुम्मनुष्ये’ ५।३।९८ यात मनुष्य शब्द स्पष्ट आलेला आहे. ज्याची अनुवृत्ती ‘जीविकार्थे चापण्ये’ ५।३।९९ या सूत्रात येते. यावरून हे स्पष्ट होते की, या प्रतिकृती माणसांच्याच बनविल्या गेल्या ईश्वराच्या नाही. $ भाष्यकाराने हेही स्पष्ट केलेले आहे की, त्यांच्यावेळी रामचंद्र व कृष्ण इत्यादिकांच्या प्रतिमा नव्हत्या. $ भाष्यकाराने देव शब्द लिहिलेला आहे तो विद्वानांच्या प्रतिमाबाबत आहे. कारण प्रतिमा साधारण माणसांच्या बनविल्या जात नाहीत. दिव्य गुणसंपन्न पुरुषांच्याच बनविल्या जातात. निरनिराळ्या उदाहरणांनी हे स्पष्ट होते की, प्राचीन आर्यांमध्ये प्रतिकृती बनविण्याची विद्या होती. परंतु त्यांनी कधी ईश्वराची किंवा कोणत्या माणसाला ईश्वराच्या स्थानी मानून त्याची प्रतिमा बनविली नाही किंवा त्यांच्या वेद इत्यादी शास्त्रांनी त्यांना असे करू देण्याची आज्ञा दिलेली नाही. $ ‘‘प्रतिमानां च भेदक:’’ या मनुच्या वाक्याने जी प्रतिमा सिद्ध केली जाते हे संपूर्ण साहसच आहे. कारण हे वाक्य राजधर्म प्रकरणाचे आहे. यात सीमा विभागासाठी जे चिन्ह बनविले जात होते किंवा तोल मापासाठी जी शेर पावशेर इत्यादींची चिन्हे होती त्यांना कमी जास्त करण्यासाठी येथे दंड लिहिलेला आहे. $ बुद्धापूर्वी प्रतिमा बनवून पूजन करण्याची प्रथा आर्यावर्तात नव्हती. याचे प्रमाण हे आहे की मगध देश व ब्रह्मर्षि देश किंवा गोनर्द देश ज्यात पाणिनि किंवा पतांजलीचा उद्भव झाला. या देशात प्राचीन भग्न देवालयात जितक्या प्रतिमा मिळालेल्या आहेत त्या सर्व बौद्ध संप्रदायी लोकांच्या आहेत. वैदिक धर्मानुयायी आर्यांची एक प्रतिमाही आतापर्यंत मिळालेली नाही. जी ईश्वर किंवा ईश्वराच्या स्थानी स्थानापन्न विशेष देवाची असेल. $ यावरून हे स्पष्ट सिद्ध होते की, प्रतिमा-पूजन बौद्धापासून सुरू झाले. ते या प्रकारे की जेव्हा बौद्धांचे पूर्ण ऐश्वर्य आर्यावर्तात पसरले तेव्हा त्यांनी बुद्धदेवाची प्रतिमा बनविली व त्या मूर्तीला पूज्य समजू लागले. बुद्धाच्या मृत्यूनंतरही त्यांचे अधिक संगठन झाले. तेव्हा वैदिक धर्मानुयायी आर्यनेत्यांनी हा विचार केला की आपल्या संगठनाची कोणती तरी आधारशिला असावी. या अभिप्रायाने त्यांच्यात असे पुरुष उत्पन्न झाले की जे बुद्धदेवाच्या तुलनेने आपल्या देवी-देवतांना महत्त्व देऊ लागले. केवळ देवी-देवतानाच पूज्य मानून न राहता त्यांच्या गुण कीर्तनाचे पुराण निर्माण करू लागले. याचवेळी प्रथम वैष्णव पुराणाची रचना झाली. याचे कारण असे की ज्या पशु-यज्ञांची निंदा करून बुद्ध किंवा बौद्ध धर्मानुयायी लोकांनी त्यांची हानी केली होती त्या दोषांचे मार्जन करणे अभीष्ट होते. याचप्रकारे हळूहळू इतर पुराणांचीही निर्मिती झाली. त्यांनी ही आपापल्या देवी देवता बनविल्या अर्थात वैष्णवांनी विष्णूची चतुर्भुज कल्पना करून विष्णूला विशेष देव बनविले व शैवांनी शिवाला सर्वश्रेष्ठ मानून त्याला आपल्या भावनेनुसार आकार देऊन आपला देव विशेष मानले. या प्रकारे भारत वर्षात शान्तदेव, रुद्रदेव, भैरवदेव इत्यादी नाना देवतांच्या पूजनाचे एक भीषण युग प्रारंभ झाले. $ यात संशय नाही की त्यांच्या नव्या रचना व नव्या प्रतिमांनी बौद्धांना अन्तर्ध्यानाच्या स्थानी अन्तर्ध्दान केले. त्यांच्या विविध देववादाने त्यांच्यात फुटीचे बीज रोवले गेले, जे भविष्यात बृहदरूप धारण करत भारताच्या अभ्युदयाचे विनाशक ठरले. $ कित्येक लोक वरील देवपूजेबाबत म्हणतात की, रुद्र देव इत्यादीची पूजा वेदाच्या आधारेच सुरू केलेली आहे. वेदात रुद्र नाव वज्र किंवा विद्युतचे आहे व तो (वृषभ) मेघाची स्वारी करतो. अर्थात ढगात विद्युत चमकते व कडकडाट करते. या रीतीने रुद्राचे वाहन (वृषभ) बैल म्हटलेले आहे. वास्तविक हा भूतलावरील चार पायाचा बैल नाही. $ याचे उत्तर असे की जर हे सूक्ष्म तत्त्वज्ञान पाहिले असता शिवलिंगाची पूजा भारतात सुरू झाली असती तर दुसऱ्या दोन्ही देवाच्या वाहनाची कोणती ना कोणती संगती अवश्य राहिली असती. अर्थात् ब्रह्माचे वाहन हंस व विष्णूचे वाहन गरुड, यांचे तात्पर्य काय? हा प्रश्न विचाल्यानंतर ते कल्पक लोक जे नवनवीन कल्पनांनी पौराणिक धर्माचे मंडन करतात ते पूर्णपणे गप्प बसतात कारण वास्तविक रुद्र इत्यादी देवांच्या मूर्ती बनवून पूजा करण्याची कोणतीच फिलॉसॉफी नव्हती; परंतु बौद्ध धर्माला त्यांच्याच शस्त्रांनी पराजित करणे अभीष्ट होते. यामुळे विष्णूसूक्त वाचून साकार विष्णूदेवतेची कल्पना केली गेली व रुद्र सूक्त वाचून साकार रुद्रदेवाची कल्पना केली गेली; परंतु या कल्पनांचा कोणताही आधार निरुक्त किंवा निघष्टु नव्हता. $ ज्या लोकांचे हे कथन आहे की (रुद) देवता मेघस्थ विद्युत बहुतकरून पर्वतावर वर्षाव करते किंवा गरजते. याच आधारावर (शिवलिंग) पाषाणमय शिवावर जलाची धार सोडली जाते. त्यांना जर हे विचारले की मग बिल्वपत्र व विष्णुचा प्रतिनिधी असलेल्या शालिग्रामावर तुळस का वाहिली जाते? तेव्हा याबाबत वैदिक तत्त्वज्ञानाचा काहीच आधार नाही. $ वास्तविकता ही आहे की त्या काळच्या कल्पनांचा वेदाशी काही संबंध नाही. ब्राह्मणग्रंथाच्या अलंकाराचा अयोग्य उपयोग अवश्य केला गेला. जसे प्राणविद्या व इंद्रियांच्या अलंकाराद्वारे देवासुर-संग्राम व आध्यात्मिक ज्ञानयज्ञाने घोड्याच्या बलिदानाचा अश्वमेध व इंद्रियांच्या दुष्टवृत्तींचे हवन करण्याने, गोमेधमध्ये गाय इत्यादी पूज्य पशूंचा वध सिद्ध केला गेला. $ वरील विषयांते निश्चित प्रमाण आमच्याजवळ आहे. मद्रासमध्ये एक गार्ग्यायण सूत्र छापलेले आहे. ज्यात आध्यात्मिक अश्वमेध इत्यादीचे वर्णन आहे. हा ग्रंथ सर पी.सी. चटर्जीच्या घरी कलकत्त्यात मी स्वत: पाहिला आहे, या प्रकारे जे ज्ञानकाण्ड प्रधान-ब्राह्मण ग्रंथात अलंकार होते. त्यांचे रूप बदलून पुराणामध्ये वर्णन केले गेले. ज्यामुळे वैदिक धर्म उलटून (विरुद्ध होऊन) आर्यांचा प्राचीन धर्म पुराणाच्या आकारात आला. याच वेळी काशीचा पाया घातला गेला ज्यात आता विश्वेश्वरनाथ व विश्वनाथ इत्यादी शिवलिंगाच्या प्रतिमा आहेत. $ येथे हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी काशी जी उपनिषदाच्या काळी होती ती यावेळी नव्हती; परंतु राजघाट स्टेशनापासून उत्तर पूर्वेच्या कोनामध्ये वरुणा व गंगेच्या संगमावर होती. कित्येक इतिहासवेत्ते म्हणतात की, उत्तर सारनाथ वरुणा नदीच्या मध्ये होती; पण यात संशय नाही की येथे नव्हती. काशी खंडात वरील गोष्टींच्या मंडनाचे हे प्रमाण आहे की याच्या प्रमाणाने आदि केशवाचे मंदिर- $ आदौ पादोदके तीर्थे विद्धि मामादिकेशवम् । $ अग्नि विन्दो महाप्राज्ञ भक्तानां मुक्तिदायकम् ॥ $ काशी खंड अ.६१ श्लोक ४ $ यात आदिकेशवालाच सर्वांहून प्राचीन ठरविले आहे. यावरून हेही स्पष्ट होते की त्यावेळी संगमाला सर्वात श्रेष्ठ समजले जाई. त्यासाठी हे आदिकेशवाचे मंदिर ठीक ठीक वरुणा व गंगेच्या संगमावर आहे. $ बुद्धाच्या पूर्वी ते विष्णूला निराकार किंवा अव्यक्त मानत असत. प्रमाण पाहा - $ अपि यो भगवानीशो मनोवाचामगोचर: । $ स मादृशैरला धीभि: कथं स्तुत्यावच: पर: । $ का.खं.अ. ६० श्लो. २८ $ इत्यादी श्लोकात विष्णूला इन्द्रियगोचर मानूनही बुद्ध देवाच्या प्रतिमेची नक्कल करून आदिकेशवाची मूर्ती तयार केली गेली याचे प्रमाण म्हणजे आदिकेशवाचे मंदिर आतापर्यंत साक्षी-भूत उभे आहे. बुद्धाच्या तुलनेची देवता पहिल्या बुद्धामध्ये केशयुक्त पुरुषासाठीही आलेली आहे; परंतु पौराणिक संस्कृतमध्ये मुख्यत्व हे नाव

    इस भाष्य को एडिट करें

    हिन्दी (3)

    पदार्थ

    हे (अग्ने) ज्ञान तथा तेजःस्वरूप प्रभो! आप (मरुत्सखा) इन्द्रियों के सखा हैं; (सोमपीतये) सृष्ट पदार्थों के पानकर्ता मुझ साधक के हितार्थ (रुद्रैः सह) रुद्रों के साथ (आ याहि) मेरे अन्तः करण में उद्भूत हों। पुनश्च (सोभर्याः) सुष्टुतया निर्वाह समर्थ, (स्वर्णरे) दिव्यसुखयुक्त मुझे नेतृत्वगुण विशिष्ट साधक के अन्तःकरण में (सुष्टुतिम्) मेरे द्वारा की गई शुभ स्तुति को लक्ष्य कर (मादयस्व) प्रसन्न हों॥१४॥

    भावार्थ

    जो साधक सृष्ट पदार्थों की बोधप्राप्ति हेतु अपनी ज्ञान तथा कर्मेन्द्रियों को प्रभु की आज्ञानुसार संचालित करता है, प्राणशक्तियाँ उसके नियंत्रण में आ जाती हैं और प्रभु को वह अपने शुद्ध तथा बलशाली अन्तःकरण में प्रदीप्त करता है। उस दिव्यसुख से सुखी अन्तःकरण से प्रतिध्वनित परमात्मा के गुणगान मानो परमेश्वर को ही आनन्दित करते हैं॥१४॥ अष्टम मण्डल में एक सौ तीनवां (तीसरा) सूक्त व पन्द्रहवाँ वर्ग समाप्त। अष्टमं मण्डलं समाप्तम्॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    वही सर्वोपास्य है।

    भावार्थ

    हे ( अग्ने ) सर्वज्ञ ! सर्वपूज्य ! तू ( मरुत्सखा ) विद्वान् जनों का मित्र होकर ( रुद्रेभिः ) दुष्टों को रुलाने वाले और समस्त प्रजाओं के दुःखों को दूर करने वाले, वायु जलादि पदार्थों द्वारा ( सोमपीतये ) उत्तम आनन्द रस, अन्न, ऐश्वर्यादि कर्म फलों का उपभोग पानादि कराने वा उत्पन्न जगत् का पालन करने के लिये ( आ याहि ) तू हमें प्राप्त हो और ( सोभर्या: ) उत्तम पूजा-अर्चना करने वाले जन की (स्वः- नरे ) सब के नायक तुझ में प्रयुक्त ( सु-स्तुतिं ) उत्तम स्तुति को श्रवण कर। ( उप मादयस्व ) स्वयं प्रसन्न हो, सब को प्रसन्न कर।

    टिप्पणी

    प्रसीद देवेश जगन्निवास । गीता ॥ । इति पञ्चदशो वर्गः॥ इत्यष्टमे मण्डले दशमोऽनुवाकः॥ ॥ इति प्रागाथमष्टमं मण्डलं समाप्तम् ॥ इति श्री-विद्यालङ्कार-मीमांसातीर्थ-विरुदोपशोभित-श्रीपण्डित जयदेवशर्मणा विरचिते ऋग्वेदाऽऽलोकभाष्येऽष्टमं मण्डलं समाप्तम् ॥

    ऋषि | देवता | छन्द | स्वर

    सोभरि: काण्व ऋषिः॥ १—१३ अग्निः। १४ अग्निर्मरुतश्च देवताः॥ छन्दः—१, ३, १३, विराड् बृहती। २ निचृद् बृहती। ४ बृहती। ६ आर्ची स्वराड् बृहती। ७, ९ स्वराड् बृहती। ६ पंक्तिः। ११ निचृत् पंक्ति:। १० आर्ची भुरिग् गायत्री। ८ निचृदुष्णिक्। १२ विराडुष्णिक्॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    प्रभु की मित्रता के लिये

    पदार्थ

    [१] हे (अग्ने) = अग्रेणी प्रभो! आप (आयाहि) = मुझे प्राप्त होइये। (मरुत् सखा) = [मितराविणां सखा] आप कम [मपा तुला] बोलनेवाले क्रियाशील पुरुषों के मित्र हैं। आप (रुद्रेभिः) = रोगों को दूर भगानेवाले इन प्राणों के द्वारा (सोमपीतये) = शरीर में सोम के रक्षण के लिये होते हैं । [२] हे प्रभो! आप (सोभर्या:) = जीवन के कर्त्तव्यों का सम्यक् भरण करनेवाले की (सुष्टुतिम्) = उत्तम स्तुति को (उप) [आयाहि ] = समीपता से प्राप्त होइये, और (स्वर्णरे) = प्रकाशमय लोक को प्राप्त करानेवाले यज्ञों में (मादयस्व) = आनन्दित कीजिये।

    भावार्थ

    भावार्थ- हम प्रभु की मित्रता की प्राप्ति के लिये परिमित बोलनेवाले हों, प्राणसाधना द्वारा सोम का शरीर में रक्षण करें, प्रभु-स्तवन के साथ यज्ञों में आनन्द का अनुभव करें।

    इस भाष्य को एडिट करें
    Top